High BP & Coronavirus : हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त, जाणून घ्या कसा करावा बचाव

नवी दिल्ली : कोरोना काळात हाय-ब्लडप्रेशरच्या रूग्णांनी आपले खाणे-पिणे आणि जीवनशैलीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना संसर्गाचा जास्त धोका असतो यासाठी अशा रूग्णांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे.

कोरोना काळात अशी घ्या काळजी

डाएटकडे लक्ष द्या :
हेल्दी डाएटद्वारे ब्लड प्रेशर मोठ्याप्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकते. मीठ, तेलकट आणि मसालेदार जेवणाचे सेवन कमी करा आणि बॉडी हायड्रेट ठेवा.

तणावापासून दूर रहा :
हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कठिण काळात सुद्धा स्वतःला तणावापासून दूर ठेवावे. एक्सरसाईज, योगा, ध्यान आणि अरोमा थेरेपी करा.

बीपीचे औषध चुकवू नका :
डॉक्टरांनी ब्लडप्रेशरचे दिलेले औषध स्किप करू नका. यामुळे ब्लड प्रेशर एकदम वर-खाली होऊ शकते.

स्मोकिंग टाळा :
या आजारात धूम्रपान आणि दारूपासून दूर रहा.

वजन नियंत्रित ठेवा :
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर वजन नियंत्रणात ठेवा. वजन जास्त असेल तर शरीराच्या एकुण वजनाच्या केवळ 10 टक्के वजन कमी केले तरी ब्लड प्रेशर नियंत्रित राहील.