Coronavirus : देशात एकाच दिवसात ‘विक्रमी’ 5611 नवे रुग्ण तर 140 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बधितांचा आकडा 106750 वर

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला असून अनेक राज्यांनी तेथील व्यवहार सुरु होण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशात आढळून आली आहे. देशात एका दिवसात सर्वाधिक ५ हजार ६११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासात देशात १४० कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशभरात ३ हजार ३०३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात सध्या ६१ हजार १४९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

देशभरात मंगळवारी ३ हजार २१४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४२ हजार २९८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.