Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या सव्वा लाखाहून जास्त, 24 तासात सर्वाधिक 6654 नवे रुग्ण तर 137 जणांचा मृत्यु, आतापर्यंत 3720 बळी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात दररोज वाढत्या संख्येने कोरोना बाधित आढळून येत असून गेल्या २४ तासात सर्वाधिक ६ हजार ६५४ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख २५ हजार १०१ इतकी झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात १३७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशभरात आतापर्यंत मृत्यु झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० झाली आहे.

 

याचवेळी शुक्रवारी सकाळपर्यंत देशात ६ हजार ८८ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यापेक्षा शनिवारी अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पूर्वी चाचणी घेतलेल्यांपैकी १२ ते १३ टक्के इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असत. गेल्या २ दिवसांपासून हे प्रमाण १८ ते १९ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

गेल्या २४ तासात ३ हजार २५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५१ हजार ७८३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यातही एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण ४१ टक्क्यांहून अधिक झाले आहे