Pune : दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; ‘कोरोना’ रुग्ण संख्या वाढण्याची भीती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या दिल्लीमध्ये कोरोना वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाचा दुसऱ्या लाटेचं संकट समोर आलं आहे. पुणे शहरातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पुण्यातून ये-जा करणाऱ्या विमानांमध्ये दिल्लीची विमाने सर्वाधिक आहेत. पुणे विमानतळावर शुक्रवारी एकूण ६६ विमानांची ये-जा झाली. सर्वाधिक २३ विमाने दिल्लीची होती. पुणे विमानतळावरुन दिल्लीसह बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी विमानतळ रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत पुढील वर्षभर बंद राहणार आहे. सध्या दररोज केवळ ६० ते ७० विमानांची ये-जा होत आहे. पुण्यात दिल्लीतून येणाऱ्या विमानांमुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीला मोठा तडाखा बसला आहे. कोरोनाची भीती कमी होत गेल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली. परिणामी, महाराष्ट्र सर्व काही राज्यांनी दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. या विमानांमध्ये ही जवळपास २५ हून अधिक प्रवासी विमानाने दिल्लीला ये-जा करणारी आहेत. त्या पाठोपाठ बेंगलोर साठी तीन ते पाच शहरांसाठी जास्त दोन ते तीन महिने आहेत. रोजची प्रवासी संख्या सध्या सात ते आठ हजारांच्या जवळपास आहे. लॉकडाउन पूर्वी हा आकडा २० हजारांच्या जवळपास होता.

मागील महिन्याच्या मध्यापर्यंत बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे क्वारंटाइन व हातावर शिक्का बंधनकारक असतात. पण आता हे बंधन नाही त्यामुळे दिल्लीसह अन्य शहरातून येणारे प्रवासी सहजपणे शहर वावरू शकतात. पुण्यातही दिल्लीतून दररोज २००हून अधिक विमानांची सेवा सुरू आहे. त्यातून सुमारे अडीच ते तीन हजार प्रवासी पुण्यात येत आहेत. तसेच, संबंधित विमानतळावरही आरोग्य सेतू ॲप शरीराचे तापमान आणि मास पाहिले जाते.

येथे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसंच , दिल्लीतून ये-जा करणारी विमाने व प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही.

कुलदीप सिंग,संचालक, पुणे विमानतळ

मागील काही दिवसांत दिल्लीतून ये जा केलेली विमाने

दिवस आलेली गेलेली

२१ नोव्हेंबर १० ९

२० नोव्हेंबर १२ ११

१९ नोव्हेंबर १२ ११

१८ नोव्हेंबर १२ ११

१८ नोव्हेंबर १२ १०