देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील ‘या’ गावात

सातारा : पोलिसनामा ऑनलाइन – या वर्षीच्या पावसाने अनेक विक्रम केले आहेत. नेहमीपेक्षा या वेळेसचा मान्सून सगळ्यांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजी पेक्षाही जादा पाऊस पडल्याची नोंद सातारा जिल्ह्यातील चार ठिकाणी झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील पाथरपुंज हे सर्वाधिक पावसाची नोंद झालेले ठिकाण बनले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.

या ठिकाणी पडला सर्वाधिक पाऊस
पाथरपुंज – ७ हजार ३५९ मिलीमीटर
चेरापुंजी – ५ हजार ९३८.४ मिलीमीटर
बलकवडी – ६ हजार ९८९ मिलीमीटर
नवजा – ६ हजार २७२ मिलीमीटर
वालवण – ६ हजार ८४ मिलीमीटर
मुळशी (पुणे) – ६ हजार ४४१ मिलीमीटर

तीन जिल्ह्यात येते पाथरपुंज हे गाव
कोयना नगरच्या नैऋेत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विशेष म्हणजे हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत.

वाशिमला सर्वांत कमी पाऊस
यंदा विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत सर्वाधिक म्हणजे १२४७.४७ मिमी पाऊस पडला. मात्र पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी अवघा ३७५.३ मिमी पाऊस पडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –