Coronavirus : देशात 24 तासात कोरोनाचे सर्वाधिक 7466 नवे रुग्ण तर 175 जणांचा मृत्यू, 3414 बाधित झाले बरे

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशात गेल्या २४ तासात उच्चांकी ७ हजार ४६६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचवेळी देशभरात १७५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर ३ हजार ४१४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात गेल्या २४ तासात ७ हजार ४६६ नवीन रुग्ण सापडल्याने आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १ लाख ६५ हजार ७९९ इतकी झाली आहे. २७ मे रोजी देशभरात ७ हजार २१९ नवीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर २८ मे रोजी त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

या एकूण रुग्णांपैकी ८९ हजार ९८७ रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. देशात गुरुवारी ३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे देशभरातील ७१ हजार १०५ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. त्याचवेळी देशभरात गेल्या २४ तासात १७५ रुग्णांचा मृत्यु झाला असून आतापर्यंत ४ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like