Coronavirus : देशात 24 तासात ‘कोरोना’चे उच्चांकी 7964 नवे रुग्ण तर 265 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 8105 बाधित झाले बरे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील पहिल्या वर्षाच्या पूर्तीच्या दिनी देशभरात नवीन कोरोना बाधितांच्या रुग्णांची संख्या विक्रमी झाली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक ७ हजार ९६४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक २६५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक ८ हजार १०५ जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले.

देशातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वेगाने वाढत असून नवा उच्चांक स्थापत आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७ हजार ९६४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ७३ हजार ७६३ इतकी झाली आहे. त्यापैकी ८६ हजार ४२२ रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
यापूर्वी २८ मे रोजी देशात २४ तासात ७ हजार ३०० नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. गेल्या सलग ३ दिवसात ७ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहे. आज तर ती संख्या ८ हजारांपर्यंत गेली.

गेल्या २४ तासात देशात सर्वाधिक २६५ रुग्णांचा मृत्यु झाला. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या मृत्युची संख्या ४ हजार ९७१ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्याचबरोबर रुग्णालयातून बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशभरातील रुग्णालयातून ८ हजार १०५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८२ हजार ३७० इतकी झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like