Coronavirus : देशात पुन्हा एकदा ‘कोरोना’चे ‘उच्चांकी’ 8380 नवे रुग्ण तर 193 जणांचा मृत्यू, 24 तासात 4614 झाले बरे

नवी दिल्ली : लॉकडाऊन ४ संपत असताना देशात गेल्या २४ तासात रेकॉर्डब्रेक ८ हजार ३८० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून आता आतापर्यंत देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या  १ लाख ८२ हजार १४३ झाली आहे. त्याचवेळी १९३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. शनिवारी देशभरातील रुग्णालयातील ११ हजार २६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने आता लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ८ हजार ३८० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८९ हजार ९९५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. काही राज्यांचा अपवाद वगळता आता देशातील अनेक राज्यांमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.

गेल्या २४ तासात देशभरात १९३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशभरात आतापर्यंत ५ हजार १६४ जणांचा मृत्यु झाला आहे. शनिवारी दिवसभरात ४ हजार ६१४ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. त्यामुळे देशभरातील तब्बल ८६ हजार ९८३ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील रुग्णांच्या बरे होण्याचा दर वेगाने वाढत आहे. सध्या तो ४८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
भारत आज जगात ९ व्या क्रमांकावर आहे. कोरोना बाधितांची संख्या अशाच वेगाने वाढत राहिली तर, उद्या सोमवार सकाळपर्यंत भारत जर्मनी आणि फ्रान्स यांना मागे टाकून ७ व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.