पुण्यातील धक्कादायक प्रकार : उच्च शिक्षित वधूची ”कोमार्य” परीक्षा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तंत्रज्ञान जस जस प्रगत होत आहे जग आधुनिकतेकडे जात आहे असं दिसून येताना अनेक ठिकाणच्या अनिष्ठ रूढी परंपरा आता कमी झाल्याचं किंवा नष्ट झाल्याचं वाटणं साहजिकच आहे पण अशाचवेळी या सगळ्यांना काळिमा फासणारी घटना घडते ती ही उच्च शिक्षित विवाहितेसोबत, इंग्लन्ड वरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या तिच्या नवऱ्याने पंचायत राज या पद्धतीला शरण जात त्याच्याच उच्च शिक्षित बायकोची कोमार्य परीक्षा घेण्यास संमती दिली, विशेष म्हणजे ज्या मुलाने आपल्या बायकोची अशी परीक्षा घेण्यास संमती दिली त्याचे वडील पुण्याचे माजी नगरसेवक आणि मुलीचे वडील माजी निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. एकाचे वडील लोकप्रतिनिधी तर एकाचे पोलीस अधिकारी अन्यायाला वाचा फोडणे हे ज्यांचे काम तेच अन्याय घडवून आणतायेत या पेक्षा दुर्दैवी अजून काही नाही. या प्रथेला विरोध करणारे कंजारभट समाजातील व धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे.
राज्य सरकारने जात पंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला आहे. मात्र कंजारभट समाज या कायद्याला ना जुमानता लपून जात पंचायती भरवत आहे. या पंचायतीमध्ये विवाहापूर्वी नवऱ्या मुलीची कोमार्य परीक्षा घेण्याची प्रथा आहे, समाजातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींचा या असल्या प्रथांना कडाडून विरोध आहे. भारतात संविधानाला ग्रन्थ मानले जाते त्यातले कायदे सगळ्यांसाठी समांतर आहे त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्यांना शिक्षा तर मिळतेच आणि वाळीत टाकलं जातं या वधू वराचा नुकताच कोरेगाव पार्क मध्ये विवाह झाला असून त्यानंतर काहीच दिवसांनी कोमार्य परीक्षा घेण्यात आली असे समोर आलं, पंचायतीच्या नियमाप्रमाणे विवाहाआधी व नंतर जात पंचायत भरविली जाते, विवाहानंतर दोघांना अज्ञात ठिकाणी नेले जाते, मधुचंद्राच्या नावाखाली खोलीत बंद केले जाते. आणि त्याच खोलीबाहेर पंचायत भरविली जाते. पंचायतीच्या निकषाप्रमाणे वधू शुद्ध नसल्यास वधू पित्याला मोठा दंड आकारला जातो आणि मग विवाहाला मान्यता दिली जाते. त्याला वरची व नातेवाईकांची संमती असावी लागते.
या कुप्रथेविरोधात याच समाजाच्या काही तरुणांनी एल्गार पुकारला होता. जातपंचायतीच्या दबावाला बळी न पडता, संघटीत होत ‘स्टॉप व्ही टेस्ट’ या सोशल मीडियाद्वारे युवकांनी व्हर्जिनिटी टेस्टला विरोध करीत नवीन वर्षात नवीन जगण्याला सुरुवात केली आहे.
‘बालपणापासून बघतोय, एखादं लग्न चांगलं होतं; पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसतात. घरात कुजबूज सुरू होते, मुलगी खराब निघाली.. पुढे कौमार्य परीक्षेबद्दल मला कळाले तेव्हा धक्काच बसला. पण मोठी मंडळी त्याबद्दल बोलूही देत नव्हती. विरोध तर दूरच…’ विवेक तमायचेकर याने सांगितले.
विनोद सध्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत अभ्यास करीत आहे. स्वत:च्या समाजाचा अभ्यास करताना या कुप्रथांमुळे तो अस्वस्थ होता. जातपंचायतीचा दबाव असल्याने कुणीच याविरोधात जाहीरपणे बोलत नव्हते. विवेकचे लग्न ठरले तेव्हा आपण ही चाचणी देणार नाही, असे त्याने ठामपणे सांगितले. त्याच्या कुटुंबावरही जातपंचायतीचा दबाव होता. त्याच्या पत्नीला विनोदच्या भूमिकेमुळे आनंदच झाला. परंतु तिचे आजोबाच जातपंचायतीचे प्रमुख पंच. विवेकने त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही.
ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने राइट टू प्रायव्हसीचा मुद्दा अधोरेखित केला. त्याआधारे विवेकने या चाचणीच्या विरोधात फेसबुकवर मत मांडले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उमेद वाढलेल्या विवेकने ‘स्टॉप व्ही टेस्ट’ अभियान सुरू केले. त्यात मुंबई, पुणे, अंबरनाथ, इचलकरंजी, अमळनेर, जळगाव, नाशिकसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथील युवक-युवती एकत्र येत आहेत. परंतु त्यांनाही समाजातून धमक्या येऊ लागल्या. मात्र त्याला न घाबरता ‘या अमानुष प्रथेच्या जोखडातून आम्हाला मुक्त व्हायचे आहे,’ विवेकने सांगितले. अंनिसनेही या अभियानाला पाठिंबा दिला आहे.