home page top 1

२७ युवक,२९ युवती ‘त्या’ अवस्थेत लॉजमध्ये सापडले ; पोलिसही चक्रावले, ‘ती’ म्हणाली २ दिवसांनी लग्‍न आहे ‘जाऊ द्याना साहेब’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देवरिया स्टेशन रोडवरील तीन हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून २९ महिला आणि २७ पुरुषांना अश्लिल चाळे करताना ताब्यात घेण्यात आले. यावेळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली असून छाप्यादरम्यान पोलिसांनी हॉटेलमधील इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांमध्ये काही ज्येष्ठांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या घरच्यांना या कारवाईची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ड़ॉ. श्रीपती मिश्र यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त शिष्यपाल सिंह यांच्य नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने इंडिया गेस्ट हाऊस, नॅशनल पॅलेस आणि सहारा पॅलेस या तीन हॉटेलवर छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वी पोलिसांनी या हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली होती.

पोलिसांच्या पथकाने तीनही हॉटेलमध्ये एकाचवेळी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी हॉटेलमधील प्रत्येक खोलीची तपासणी केली. यावेळी इंडिया गेस्ट हाऊस मधून आठ आणि सहारा पॅलेस मधून ११ जोडप्यांना पकडण्यात आले. नॅशनल पॅलेजमधून १० महिला आणि आठ पुरुषांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या महिलांमध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. कारवाईनंतर पकडण्यात आलेल्या सर्वांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

दरम्यान, एका मुलीने आपले दोन दिवसांनी लग्न आहे, आपल्या सोडून द्या. अशी विनंती पोलिसांकडे केली. तुम्ही जर कारवाई केली तर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे कारवाई न करता मला सोडून द्या. अशी विनंती पकडण्यात आलेल्या एका मुलीने केली. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like