Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरातही मोठी वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय बाजारात गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार होत आहे. काही दिवसापूर्वी सोन्याच्या दरात घट झाली होती. आता मात्र सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १० रुपये इतकी वाढ झाली. तर चांदीच्या दरात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तब्बल १४०० रुपयांनी प्रति किलो एवढी वाढ झाली आहे. तर आताचे चांदीचे दर ६५ हजार इथपर्यंत पोहचले आहे.

सोन्याच्या दरात येणार तेजी –

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात झालेली घसरण अधिक काळासाठी नाही. डॉलरच्या किमतीतील कमकुवतपणा, वाढत्या महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. जगभरातील सद्यस्थिती पाहता तज्ञांनी सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर ५२,००० ते ५३,००० च्या पुढे जाऊ शकणार आहे. असे म्हटलं गेलं आहे. तसेच, २०२१ मध्ये सोने ६३ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते. म्हणून, सोन्याच्या दरातील यापूर्वीची घसरण पाहता तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असं जाणकारांनी म्हटलं आहे.

सोन्याचे सध्याचे (प्रति १०) दर –

२२ कॅरेट – ४३,३८० रुपये

२४ कॅरेट – ४४,३८० रुपये

चांदीचे आजचे दर –

प्रति किलो ६५,००० रुपये