Today Gold Rate (MCX) : Lockdown च्या भीतने सोन्याच्या दरात वाढ, 2 महिन्यात 4 हजारांनी महागलं सोनं; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच लग्नसाईला सुरुवात झाल्याने सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा दर 45 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. आता हे दर 48 हजारांहून अधिक झाले आहेत. मागील दोन दिवसांत देशात सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसून येत आहे. सध्या सोन्याच्या किमतीमध्ये किरकोळ घट पहायला मिळत आहे.

दोन दिवसांच्या वाढीनंतर आजे सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे. गुरुवारी MCX वर सोन्याचा वायद्यात 0.04 टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याचे नवे दर 48 हजार 210 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले आहेत. तर चांदीच्या किंमतीत देखील आज घट झाली आहे. सराफा बाजारात गुरुवारी चांदीचा वायदा 0.05 टक्क्यांनी खाली आला असून दर 70 हजार 304 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

सोन्याचे दर उच्चांक गाठणार ?

देशात कोरोना संसर्गाने चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचे संकट वाढत असल्याने गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर उच्चांकावर म्हणजे 56 हजार 200 रुपयांवर पोहचले होते. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. यामुळे पुढील काही दिवसामध्ये सोन्याचे दर पुन्हा एकदा नवा उच्चांक प्रस्थापित करतील.