सिग्नल App इफेक्ट ! Hike अ‍ॅप बंद; कोट्यावधी वापरकर्त्यांना बसणार फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोट्यावधी हायक स्टिकर चॅट अ‍ॅप आता वापरकर्ते लोंकासाठी वाईट बातमी आहे. कारण Hike चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केविन भारती मित्तल यांनी Hike अ‍ॅप बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. हि माहिती त्यांनी ट्विटरवरून सांगितली आहे. Hike बंद झाल्याचा फटका कोट्यवधी वापरकर्त्यांना बसणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच Hike अ‍ॅप बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. Hike च्या ठिकाणी नवीन कंपनी बाजारात आणत असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. शेवटी हे अ‍ॅप आता अधिकृतपणे बंद करण्यात आले आहे. .तस्सेच गुगल प्ले स्टोरमधूनही हे अ‍ॅप बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप कोणीही डाऊनलोड करू शकणार नाही. वापरकर्त्यांनी अ‍ॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित ठिकाणी स्टोअर करण्यासाठी कंपनीने मुदत दिली आहे. तसेच काही समस्या असल्यास १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत युझर्स कंपनीशी संपर्क करू शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

तसेच CEO मित्तल म्हणतात, जोपर्यंत बाहेरील देशांतील कंपन्यांवर प्रतिबंध लावला जात नाही, तोपर्यंत ‘हाइक’ किंवा अन्य कोणतेही भारतीय अ‍ॅप्स टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या अ‍ॅप्सशी स्पर्धा करू शकत नाही, तर हाइककडून Rush आणि Vibe हे दोन अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. Rush एक गेमिंग प्लॅटफॉर्म असून, यामध्ये युजर्स कॅरम आणि लूडो यांसारखे खेळू शकतात. तर, Vibe एक कम्यूनिटी प्लॅटफॉर्म आहे. असे ते म्हणाले. पण Hike च्या कोट्यावधी युझर्सचे आभार मित्तल यांनी यावेळी मानले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप च्या नवीन गोपनीयता धोरणावर नाराज झालेले अनेक लोक सिग्नल टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅप्सकडे वळले आहेत. त्यात मेक इन इंडिया Hike कडे सर्वांचे लक्ष होते.परंतु हाइक अ‍ॅप बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दरम्यान २०१२ मध्ये Hike Sticker Chat App भारतात लॉन्च करण्यात आले होते. कमीच हे अ‍ॅप लोकप्रिय झाले होते.आणि कोट्यवधी युझर्सकडून Hike App डाऊनलोड करण्यात आले होते.