भारताला मोठा धक्का ! हिमा दासनं ऑलिम्पिकपूर्वीच सोडला ‘आपला खेळ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाचे वर्ष हे ‘ऑलिम्पिक इयर’ असल्याने प्रत्येक खेळाडू आपले संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करत आहे. परंतु ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. 400 मीटर वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आणि एशियन गेम्सची रौप्यपदक विजेती हिमा दास वर्षभरासाठी आपल्या आवडत्या स्पर्धेपासून (400 मीटर) दूर जात असून आता ती आपले लक्ष 200 मीटरवर केंद्रित करणार आहे. दरम्यान, यानंतर, वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली आहे. त्यानुसार हिमा पुढच्या वर्षी या शर्यतीत सहभागी होणार आहे.

दरम्यान, दुखापत आणि तापामुळे तिच्या वेग आणि सामर्थ्यावरही परिणाम झाला आहे, जो तिला परत मिळवायचं असल्याचे ती 200 मीटर शर्यतीत लक्ष केंद्रित करणार आहे. हिमाचे 200 मीटर मधील सर्वोत्तम 23.10 सेकंद आहे. 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यापासून ती जखमींशी झुंज देत आहे.

हिमा दास 400 मीटरसाठी तयार नाही :
अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे हाय परफॉरमन्स डायरेक्टर व्होल्कर हेरमन म्हणाले की, हिमा दास अद्याप 400 मीटरसाठी पूर्णपणे तयार नाही. आवश्यकतेनुसार, त्यांच्याकडे अद्याप तेवढी क्षमता नाही आणि 400 मीटरमध्ये आपल्याला चांगले प्रशिक्षण आणि सामर्थ्य आवश्यक आहे. त्यांनी सांगितले कि, आम्हाला मागील सत्राप्रमाणे कोणतीही चूक करायची नाही, तसेच कोणाला मजबूर देखील करायचे नाही. हिमाला 400 मीटरमध्ये स्पर्धा करण्यास सांगितले तर त्यांच्यावर खूप दबाव येईल. त्या अजून तरुण आहे आणि आम्हाला कोणतीही घाई करायची नाही.

400 मीटर मध्ये मिळणार मदत :
प्रशिक्षकांना देखील आशा आहे की, 200 मीटर हिमा दासला वेग वाढविण्यात मदत करेल, जेव्हा ती 2021 मध्ये 400 मीटरमध्ये परत येईल तेव्हा तिच्यासाठी हे थोडे सोपे होईल. मागील सत्रात हिमाने 200 मीटरमध्ये चार सुवर्णपदके जिंकली. हेरमन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ती पाठीच्या दुखापतीतून झगडत होती. ज्यानंतर बरे झाल्यानंतर तिला ताप आला आणि तिला व्यवस्थित प्रशिक्षण देता आले नाही. म्हणूनच त्यांना त्यांची जुनी लय मिळवण्यासाठी 200 मीटरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिमा 4 x 400 मीटर रिले पथकाचा भाग असण्याची शक्यता कमी आहे. फेडरेशन मे महिन्यात अंतिम फेरी करेल.