हिमा दास बनणार आसामची ‘ब्रँड अँबॅसिडर’

आसाम :वृत्तसंस्था 
फिनलंड च्या  टेम्पेयर येथे आईएएएफ विश्व अंडर-२० चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड पदक पटकावणारी  हिमा दास आसामची पहिली ‘ब्रँड अँबॅसिडर’ बनणार आहे. हिमा आसाम मध्ये परतल्यानंतर राज्य स्तरीय कार्यक्रम घेऊन हिमाचा सन्मान करणार आहे. तसेच यावेळी तिला ५० लाख रुपयांचा पुरस्कार देखील देणार आहेत.
[amazon_link asins=’B072M4QFZV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e44d3d1-8a95-11e8-8d82-c5527ac623ff’]
आसाम चे मुख्यामंत्री सर्वानंद सोनोवाल  यांनी  नगांव जिल्ह्यातील ढिंग क्षेत्रातील तीन नंबरच्या कांदुलिमारी गावात जाऊन हिमाच्या आई -वडील आणि परिवारातील इतर सदस्यांची भेट घेतली. हिमाचे वडील  रंजीत आणि आई जुनाली यांना हिमाला राज्याचे  ब्रँड अँबेसिडर करणार आहोत असे सांगितले. आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांनी हिमाच्या आई -वडिलांचे अभिनंदन केले. तसेच हिमा ही इतर लोकांकरिता प्रेरणास्थान आहे असे सांगितले. तसेच तिने जगभरात आसामचे नाव उंचावले आहे अशी भावना व्यक्त केली. हिमाने घेतलेल्या अथक मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
[amazon_link asins=’B00WTHJ5SU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1ca4d09-8a95-11e8-986f-e781475afe06′]