हिमाचल : केंद्राकडून मिळणार्‍या मोफत रेशनमध्ये बदल, आता इतके किलो तांदूळ अन् गहू मिळणार, जाणून घ्या

सिमला : केंद्र सरकारने पावणे सहा लाख गरीब रेशन कार्डधारकांना मिळणार्‍या मोफत रेशनमध्ये बदल केला आहे. आता या ग्राहकांना प्रतिव्यक्ती 2 किलो तांदुळ, 3 किलो गहू मिळतील आणि प्रति कार्ड एक किलो काळे चने मिळतील. कोरोनामुळे यापुर्वी ग्राहकांना 5 किलो प्रति व्यक्ती तांदूळ आणि प्रति कार्ड एक किलो मोफत काळे चने मिळत होते. केंद्राने हिमाचलला मोफत रेशनचा सप्लाय पाठवण्यास सुरूवात केली आहे.

अन्न नागरि पुरवठा आणि ग्राहक विभागाने जिल्हा अन्न नियंत्रक अधिकारी (डीएफसी) यांना अ‍ॅलोटमेंट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. याच आठवड्यापासून लोकांना डेपोतून मोफत रेशन मिळण्यास सुरूवात होईल. विशेष म्हणजे कोरोनामुळे केंद्र सरकारने गरीबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे मोफत रेशन आगामी महिन्यांपर्यंत मिळत राहणार आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक विभागाचे डायरेक्टर आबिद हुसैन यांनी सांगितले की, गरीब लोकांना आता 2 किलो तांदूळ, 3 किलो गहू देण्यात येत आहे. हिमाचलमध्ये सप्लाय पोहचण्यास सुरूवात झाली आहे.

राज्यात टॅक्स देणारी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी तयार केली आहे. या लोकांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरनंतर डेपोतून स्वस्त रेशन मिळणार नाही. सरकारला टॅक्स देणार्‍या या नोकरदारांची संख्या दिड लाखापेक्षा जास्त आहे.