धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका; तरीही वाचवले 35 जणांचे जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल रस्ते परिवहन निगमच्या (HRTC) धावत्या बसमध्ये बसचालकाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान बसमध्ये 35 प्रवासी होते. पण बेशुद्ध होण्यापूर्वी बसचालकाने बसवर नियंत्रण मिळवत बसचा ब्रेक दाबला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि या सर्व प्रवाशांचा जीव वाचला.

सरकाघाट डेपोतील ही बस अवाहदेवी येथे जात होती. त्यादरम्यान बसचालकाच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला घाम सुटू लागला आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटत होते. त्यावेळी बसचालक ओरडू लागला आणि प्रवाशांना बाहेर उतरण्यास सांगितले. त्यानंतर बसला ब्रेक लावल्यानंतर प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. तेव्हा स्टेअरिंगवरच चालक शामलाल बेशुद्ध झाले. त्यांना हमीरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

दुसऱ्या बसच्या मदतीने प्रवासी रवाना
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आगार व्यवस्थापक नरेंद्र शर्मा हे दुसरी बस घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एका खाजगी वाहनातून बसचालकाला रुग्णालयात नेले. तर इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवले. दरम्यान, पोस्टमोर्टम केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.

रानाबागमध्ये कार दरीत कोसळली
छतरी-रानाबाग रस्त्यावर रानाबागच्या मंगळवारी सुमारे 3 वाजता दरीत कोसळली. त्यामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे.