दरीत बस कोसळून २५ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

कुलू : वृत्तसंस्था – खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हिमाचल प्रदेशातील कुलू येथे घडली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण प्रवास करत होते. ही बस कुलू येथील बंजार येथे आली असता बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. बस बंजारा येथू गुडगुशानी येथे जात होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या अपघातात बसचे टुकडे टुकडे झाले आहेत. या अपघातात वाचलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भीषण अपघातानंतर आमचे प्राण वाचल्याने हा एक दैवी चमत्कार आहे. या अपघातात १२ महिला, ६ मुली, ७ लहान मुले रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या ठिकाणी बचाव कार्य़ सुरु आहे.

अपघातग्रस्त बस कुलू जिल्ह्यातील असून ती खासगी बस होती. गुडगुशानीच्या दिशेने जात असताना एका वळणावर आल्यानंतर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून मदत कार्य़ सुरु करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा