केरळनंतर आता हिमाचल प्रदेशात ‘अमानुष’ कृत्य, गर्भवती गायीला खाऊ घातली ‘स्फोटक’ (व्हिडीओ)

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केरळच्या मलप्पुरममध्ये गर्भवती हत्तीणीला अननसातून फटाके खायला घालून मारल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला आहे. आता हिमाचल प्रदेशातून असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंदुता भागात एका गर्भवती गायला कोणीतरी फटाक्याचा गोळा करुन खायला दिला, यामुळे गाय गंभीर जखमी झाली आहे.

गायच्या मालकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, जो खूपच व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेपासून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

यापूर्वी मलप्पुरममध्ये, एका गर्भवती हत्तीणीला कोणीतरी अननसामध्ये फटाके टाकून खायला घातले होते, ज्यामुळे तिचे तोंड व जबडा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झाल्यानंतर हत्तीनी वेलीयार नदीवर पोचली, जिथे ती तीन दिवस पाण्यात तोंड घालून होती. नंतर तिचा आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केरळ सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. खुद्द पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणात दखल घेतली आहे.

 

 

 

 

 

गर्भवती हत्तीणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. वनमंत्री के राजू म्हणाले की, या हत्येमध्ये अनेक लोकांचा सहभाग होता आणि सर्व लोकांना अटक केली जाईल. पोलिस व वन विभाग याचा तपास करीत आहेत.