हिमाचल प्रदेश : गेस्टहाऊस कोसळून दोन लष्करी जवानांसह तिघांचा मृत्यू, १४ जण अद्याप ढिगाऱ्याखाली

सोलन (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील सोलन येथे कुमारहट्टी-नाहन माहामार्गावर सेहज ढाबा आणि गेस्ट हाऊसची बिल्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्य़ंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन जवानांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली ३५ लोक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आत्तापर्यंत २३ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्यांमध्ये १८ लष्करी जवानांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश असून ती हॉटेल मालकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले कि, पंचकुला येथून एनडीआरफचे एक पथक घटनास्थळी पोहचले आहे. तसेच या ठिकाणी डॉक्टरांचे देखील एक पथक तैनात करण्यात आले आहे. मदत कार्य़ सुरु असून काही तासात मदत कार्य़ संपेल. या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी अशीच एक घटना घडली होती. जोरदार वादळी वाऱ्यामुळे एका गाडीचे छत उडून गेले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी एका हॉटेलमध्ये घुसून नदीत कोसळली. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आजपर्यंत एवढा पाऊस या ठिकाणी कधीच पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या