हिमाचलप्रदेश : गेस्ट हाऊसची बिल्डींग कोसळल्याने ३५ लष्करी जवान ढिगार्‍याखाली अडकले, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील सोलन येथील कुमारहट्टी-नाहन महामार्गावरील सेहज ढाबा आणि गेस्टहाऊसची बिल्डींग कोसळली. या दुर्घटनेत ३५ जवानांसह अनेक लोक गाडले गेल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय सेनेचे जवान या ठिकाणी जेवणासाठी थांबले असता अचानक सेहज ढाबा आणि गेस्टहाऊसची इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे. मात्र, मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मतदकार्यात अडथळा येत आहे.

या दुर्घटनेत जवानासहीत हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हॉटेल मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असून तिन मजली इमारत आहे. हे जवान डगशाई छावणीतील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत किती लोक अडकले आहेत हे अद्याप समजू शकले नाही.

हिमाचल प्रदेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी अशीच एक घटना घडली होती. जोरदार वादळी वाऱ्यामुळे एका गाडीचे छत उडून गेले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी एका हॉटेलमध्ये घुसून नदीत कोसळली. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आजपर्यंत एवढा पाऊस या ठिकाणी कधीच पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

You might also like