दहशतवादी हल्ल्यात हिमाचलचा जवान शहीद

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – काश्मीर खोऱ्यातील सीमारेषेवर दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले सुरुच आहेत. दहशतवाद्यांविरोधात लढताना हिमाचल प्रदेशच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण आले आहे. अनिल कुमार जसवाल (वय-२६) असे शहिद जवानाचे नाव असून ते उना जिल्ह्यातील बंगाणा सब-डिव्हिजन सरोहा येथील रहिवासी आहेत.

दहशतवाद्यांविरूद्ध करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अनिल कुमार जसवाल सहभागी होते. सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकी दरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी जम्मू कश्मीरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. शहिद अनिल कुमार यांचा दोन दिवसापूर्वीच वाढदिवस झाला होता.

शहिद अनिल कुमार जेक रायफलमध्ये शिपाई पदावर तैनात होते. त्यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता आणि जानेवारी महिन्यात त्यांच्या मुलाचा जन्म झाला. शहीद अनिल कुमार सहा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते दोन आठवड्यांपूर्वीच सुट्ट्यांवरून ड्यूटीवर परतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवारी दक्षिण कश्मीरमधील बडूरा (अनंतनाग) येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये १२ तास चाललेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. यात मेजरसहित दोन जवान शहीद झाले. या चकमकीत अनिल कुमार जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक बातम्या

दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी

#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना