शेतकरी आंदोलनावर कंगनाचं ट्विट पाहून भडकली हिमांशी खुराना ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकिस बानोबद्दल ट्विट केलं होतं. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं. यावर आता बिग बॉस 13 (Bigg Boss 13 ) ची स्पर्धक आणि पंजाबी अ‍ॅक्ट्रेस हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिनं ट्विट केलं आहे आणि कंगनावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाली हिमांशी ?

कंगनाच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना हिमांशी खुरानानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, ओह म्हणजे आता ती नवीन स्पोकपर्सन आहे. एखाद्या गोष्टीला चुकीचा अँगल देणं कुणी यांच्याकडून शिकलं पाहिजे. जेणेकरून उद्या ही लोकं काही करतील, त्याआधीच लोकांमध्ये कारण पसरवून दिलं की, का दंगे होतील. स्मार्ट आणि ना पहिल्या गव्हर्न्मेंटपासून लोक खूश होते आणि नाही आता. जर आमच्या सीएम साहेबांनी येऊन केलं तर ते स्वत: थंडीत रस्त्यावर नसते उतरले.

काय म्हणाली होती कंगना ?

कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, लज्जास्पद. शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपली पोळी भाजत आहे. आशा आहे की, सरकार अँटी नॅशनल गोष्टींना याचा फायदा घेऊ देणार नाही आणि टुकडे टुकडे गँगला दुसरं शाहीन भाग नाही बनवू देणार असंही ती म्हणाली होती.

कंगनानं एका ट्विटला रिट्विट केलं होतं. यात तिनं प्रोटेस्टमध्ये दिसणाऱ्या वृद्ध महिलेबद्दल ट्विट केलं होतं, ज्या शाहीन बागेत सहभागी असणाऱ्या दादी बिलकीस बानो असल्याचं सांगितलं जात होतं. ट्रोल झाल्यानंतर कंगनानं हे ट्विट डिलीट केलं. कारण तिनं जे ट्विट रिट्विट केलं होतं ते फेक होतं.