अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, शेतकरी प्रदर्शनात झाली होती सहभागी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली आहे. यावेळी, तिचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्हला येणे फार चिंतेची बाब आहे कारण अलीकडेच तिने पंजाबमधील शेतकऱ्यांसह प्रदर्शनात भाग घेतला होता. भारत बंद अंतर्गत प्रदर्शनात हिमांशीही सहभागी होती. अशा परिस्थितीत, कोरोनाच्या विळख्यात येणे त्या प्रदर्शनात सामील असलेल्या सर्वांनासाठी धोकादायक आहे.

कोरोना पॉझिटिव्ह हिमांशी खुराना
हिमांशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. पोस्टमध्ये ती सांगत आहे की, तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने लिहले की, मला सांगायचे आहे की, माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सर्व प्रकारची काळजी घेतली होती. आपल्या सर्वांना माहिती आहेच की नुकत्याच मी एका प्रदर्शनामध्ये हजर होते आणि तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे मी शूटिंगला जाण्यापूर्वी माझी टेस्ट करवून घ्यावी असे मला वाटले. जो कोणी माझ्या संपर्कात आला त्याने त्याची टेस्ट करुन घ्यावी अशी माझी इच्छा आहे. या वेळी जे कोणी प्रदर्शन करत आहे त्यांना आपली काळजी घ्यावी.

View this post on Instagram

🙏🙏

A post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana) on

शेतकऱ्यांच्या प्रदर्शनामध्ये झाली होती सहभागी
हिमांशीने पंजाबमधील शेतकऱ्यांसह कृषी विधेयकाविरोधात प्रदर्शने केली होती. त्यावेळी ती म्हणाले होती की, सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत नाही. तिचा प्रियकर असीमनेही तिचे जोरदार कौतुक केले होते, पण आता तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येणे सर्वांसाठीच चिंतेचे कारण बनले आहे. आता ती प्रदर्शनाच्या वेळी किती जणांच्या संपर्कात आली, हे ओळखणे एक मोठे आव्हान असणार आहे.

बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही स्टार्स सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. जेव्हापासून शूटिंगला सुरूवात करण्यास मंजुरी मिळाली तेव्हापासून मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आता हिमांशीचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like