कौतुकास्पद ! वडिल आणि भावाच्या मृत्युच्या धक्क्यानंतरही ‘तो’ पहिल्याच प्रयत्नात IAS परिक्षा झाला पास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २६ वे स्थान मिळवणाऱ्या हिमांशु नागपाल याच्या जिद्दीची गोष्ट सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. वडील आणि तरुण भावाच्या मृत्यूनंतर देखील त्याने जिद्द न हारता त्याने या परीक्षेची तयारी केली आणि यश देखील मिळवले. हरियाणामधील एका छोट्याश्या गावातून येणाऱ्या हिमांशु नागपाल याने या परीक्षेची कसून तयारी करत आणि आपल्या काकापासून प्रेरणा घेत या अत्यंत अवघड परीक्षेत २६ वा क्रमांक पटकावला.

पिता भाई को खोकर भी नहीं टूटा हौसला, पहली कोशिश में IAS बना ये शख्स

एका मुलाखतीत हिमांशु नागपालने आपल्या या संघर्षाबद्दल सांगितले. त्याने सांगितले कि, दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलो असताना होस्टेलच्या मुलाखतीच्या बोर्डावर इतर मुलांची नवे बघितल्यानांतर वडील म्हणाले होते कि, एक दिवस तुझे नाव देखील या बोर्डावर मला पाहायचे आहे. मात्र त्याच दिवशी घरी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याने सांगितले कि, प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात. त्यातून बाहेर पडून काहीतरी शिकणे फार महत्वाचे असते. त्यावेळी कुटुंबातील अन्य सदस्यांनी तसेच कॉलेजमधील मित्रांनी आणि प्राध्यापकांनी देखील मला धीर दिला. त्याचबरोबर त्यांनी या स्पर्धा परीक्षेसाठी मला मोठ्या प्रमाणात मदत केली.

पिता भाई को खोकर भी नहीं टूटा हौसला, पहली कोशिश में IAS बना ये शख्स

कुणी गावठी म्हणू नये

हिमांशूने सांगितले कि, हरियाणातील एका लहान गावात जन्म झाल्याने पाचवीपर्यंत त्याने हिंदी माध्यमातच शिक्षण घेतले. त्यावेळी इंग्रजीची अजिबात माहिती नव्हती. त्याचवेळी मी शहरात शिक्षणासाठी आलो असता मला इंग्रजी शब्दांचे नीट उच्चार करता येत नसत यामुळे मला गावठी म्हणू नये याची भीती वाटतं असे. त्याचबरोबर त्याने पुढे बोलताना सांगितले कि, कॉलेजमध्ये दोन वर्ष मी फक्त अधिकारी कसे होऊ शकतो याचाच अभ्यास केला. मला आमदार आणि खासदार या दोन्हींमधील फरक देखील माहित नव्हता. यावरून अनेकदा माझी खिल्ली उडवली जात असे मात्र मी शिकणे सोडले नाही.

पिता भाई को खोकर भी नहीं टूटा हौसला, पहली कोशिश में IAS बना ये शख्स

काॅलेज सोडावे वाटले होते

मात्र आयुष्य सुरळीत चालू असताना अचानक माझ्या भावाचे निधन झाले. त्यावेळी मी स्वतःला उभे करूच शकत नव्हतो. माझ्यासाठी सगळं काही संपलं होते. मी कॉलेज सोडून घरी जाण्याचा विचार केला होता. त्यावेळी मी पुन्हा कधीही शिक्षणाचा विचार करत नव्हतो.

पिता भाई को खोकर भी नहीं टूटा हौसला, पहली कोशिश में IAS बना ये शख्स

काकांनी केली मदत

त्या कठीण परिस्थितीतून जात असताना त्याला त्याचे काका पंकज नागपाल यांनी मोठा आधार दिला. यावेळी त्याने आपल्या काकाला वडिलांचा दर्जा देत त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी माझी मदत करत मला पुन्हा उभे केले असल्याचे देखील त्याने सांगितले.

पिता भाई को खोकर भी नहीं टूटा हौसला, पहली कोशिश में IAS बना ये शख्स

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय