रानू यांचं ‘फुटपाथ ते बॉलिवूड’ व्हाया हिमेश रेशमिया, रेकॉर्ड केलं गाणं (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हिमेश रेशमिया आधीपासूनच आपल्या नवीन चित्रपटासाठी चर्चेत असून, आता तो आणखी एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, आपल्या गायनाने एका रात्रीत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायरल झालेल्या रानू मंडल हिला हिमेशला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. अलीकडेच हिमेशने हे गाणे रानूबरोबर रेकॉर्ड केले.

हिमेश रेशमियाने रानूच्या गायनाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये राणू चित्रपटाचे गाणे गात असल्याचे दिसून आले आहे. हिमेशने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, रानू मंडलच्या आवाजात हॅपी हार्डी आणि हीरचे गाणे रेकॉर्ड केले आहे. ये गाणे ‘तेरी मेरी कहानी’ असे असून माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. हिमेशने असेही लिहिले आहे की तुम्ही जिथे असाल तिथे तिथून प्रारंभ करा, तुमच्याकडे असलेल्या स्रोतांचा वापर करा आणि मला आशा आहे की निरंतर प्रयत्नांनी तुमचे स्वप्न नक्कीच साकार होईल. तुमच्या सर्व प्रेम आणि सपोर्ट साठी तुमचे आभार.

कोण आहे रानू , कशी झाली स्टार :
रानूने भीक मागताना रस्त्यावर गायलेले लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाऊन सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. रानूने बबलू मंडलशी लग्न केले पण पतीच्या निधनानंतर ती पश्चिम बंगालमधील रानाघाटमध्ये परतली. दररोज येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी रस्त्यावर गाणी गाऊन आपली उपजीविका करते. रानूची मेकओव्हर सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. मेकओवरनंतर ती एकदम फ्रेश दिसते. हिमेशच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे हॅपी हार्डी आणि हीर. या चित्रपटात रानू तेरी मेरी कहाणी नावाचे गाणे गाणार आहे.

रानूला हिमेश रियलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’च्या सेटवर भेटला. हिमेश म्हणाला की, “मी रानूजीला भेटलो आणि मला वाटतं की त्यानं आवाजाच्या स्वरूपात दैवी भेट मिळाली आहे. त्यांचे गायन उत्तम आहे आणि मी त्यांच्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करीत आहे.” तिला बर्‍याच ऑफर्सही येत होत्या, पण तिला सर्वात मोठी भेट तिच्या मुलीच्या भेटीच्या स्वरूपात मिळाली.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like