न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ‘इंडिया डे’ परेडमध्ये सहभागी होणारी ‘हिना खान’ ठरली TVवरील पहिली अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीमधील हिना खान हे एक नावाजलेले नाव आहे. हिना खानने कमी काळात बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. यावर्षी तिने कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही हजेरी लावली होती. आता हिनाला न्यूयॉर्कमध्ये ‘इंडिया डे परेड’ साठी आमंत्रित केले गेले आहे.

https://twitter.com/AlizaJF12/status/1158481450238263296

यासह हिना खान ही पहिली टीव्ही अभिनेत्री बनली आहे जिला इंडिया डे परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळत आहे. हिनाच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या या कर्तृत्वाचा गर्व वाटतो. चाहते सोशल मीडियावर कमेंटद्वारे अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत.

१८ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या यावर्षीच्या इंडिया डे परेडमध्ये सैन्य दलांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘इंडिया डे परेड’ मध्ये हजारो भारतीय सहभागी होतात. यावर्षीच्या परेडची मुख्य थीम म्हणजे ‘तुमच्या सैनिकांना पाठिंबा द्या, तुमच्या सैनिकांना सलाम करा’.

मागील वर्षाप्रमाणेच भारतातील अनेक सेलिब्रिटी विशेष पाहुणे म्हणून परेडला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री हिना खान, राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे आयुक्त अ‍ॅडम सिल्व्हर यांचा समावेश आहे. ”

एफआयए न्यूयॉर्क ट्रीचे प्रदेशाध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, “आमचे सैनिक, सैनिक आमच्यासाठी आपले प्राण अर्पण करतात. ही आम्हाला त्यांची सेवा, धैर्य आणि त्याग लक्षात ठेवण्याची संधी आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर हिना खान अखेर एकता कपूरच्या शो ‘कसौटी जिंदगी की’ शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये त्याने व्हिलन कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारली होती. सध्या हिना खान तिच्या चित्रपटाच्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त