हिनाने खास अंदाजात केले ‘कान्स’ मध्ये पदार्पण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानेने ७२ व्या कान्स फिल्मच्या फेस्टिवलमध्ये तिने पदार्पण केले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिने चमकदार गाउनची निवड केली. हा गाउन लेबनानचे एक डिजाइनर जियाद नकाड यांनी केला होता.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या मालिकेत उत्साहाने काम करणारी अभिनेत्री हिना खानने चमकदार ग्रे कलरचा गाउन परिधान केला होता. प्लंजिंग नेकलाईन आणि मॉडरेट ट्रेल या गाउनची सुंदरता वाढवत होती.

View this post on Instagram

🌺 📸 @tejpal_nagi

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

हिना खुप छान मेकअप केला होता. त्याचबरोबर तिने गुलाबी कलरची लिपस्टिक लावली होती. तिने इन्स्टाग्रामवर ब्लॅक एंड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हिना फोटोग्राफरसमोर पोज देत असल्याचे दिसते.

या फोटोमध्ये हिनाने कॅप्शनमध्ये लिहले की, ‘कान्स २०१९, हे फोटो फक्त फोटो नसून देवाचा इशारा आहे. चमकता सितारा आहे.’ ७२ वे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हिना भारताकडून एक वक्ता असेन. यामध्ये तिची चित्रपट ‘लाइंस’ चा पहिला लूक लॉंच करण्यात येणार आहे. जो कारागिल युद्धाच्या पृष्ठभूमिवर आधारित असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like