हिना खानच्या फोटोशूटने वेधलं नेटककर्‍यांचं लक्ष, देसी लूकमधील फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री हिना खानने २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. हिना खान बिग बॉस १४ मध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. हिना खानने बॉलिवूड चित्रपट ‘हॅक्ड’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१७ साली ‘फियर फॅक्टर खतरों के खिलाडी’ची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकतंच हिना खानने तिचे लेटेस्ट ट्रेडिशनल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या रॉयल फोटोशूटमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसते आहे. हिनाच्या नोज रिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते.