Hina Khan वडीलांच्या निधनाची बातमी समजताच परतली मुंबईत, एयरपोर्टवर असे लपवले दु:ख

मुंबई : टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही वडीलांच्या निधनाचे वृत्त समजताच मुंबईत परतली. तिच्या वडीलांचे कार्डियक अरेस्टने निधन झाले. या वृत्ताने तिला दु:ख अनावर झाले. नुकतीच ती मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती खुपच दु:खी झाल्याचे दिसून आले.

अभिनेत्री हिना खान आपल्या आगामी प्रोजेक्टच्या शूटसाठी मुंबईच्या बाहेर होती. या दरम्यान वडील गेल्याची बातमी तिला समजली. हे समजताच अभिनेत्री सर्वकाही सोडून मुंबईत परतली आहे. मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झालेल्या हिनाने स्वताला पूर्णपणे कव्हर केले होते. तिने ब्लू आणि व्हाईट कलरचा आऊटफिट घातला होता. सोबतच स्काय ब्लू कलरचे डेनिम जॅकेटसुद्धा कॅरी करत होती. या दरम्यान तिने ब्लॅक घालून आपले पाणावलेले डोळे लपवल्याचे दिसत होते.

हिना खानच्या वडीलांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दिली होती. मात्र, अजूनपर्यंत या वृत्तावर हिनाच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर, हिना खान आपल्या वडीलांच्या किती जवळ होती, हे मागील लॉकडाऊन दरम्यान दिसून आले होते. अभिनेत्रीने लॉकडाऊन दरम्यान वडीलांसोबतचे अनेक फनी व्हिडिओज पोस्ट केले होते.

हिना खान एक ट्रॅडिशनल काश्मीरी फॅमिलीतील आहे. सुरुवातील ती अभिनेत्री होणे कुटुंबातील कुणालाही पसंत नव्हते. परंतु नंतर सर्वांनी तिला सपोर्ट केला.