ब्रॉयफ्रेंडला KISS करतानाचे हिना खानचे फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या फोटोंमुळे ती चर्चेतही असते. टीव्ही अभिनेत्री हिना खान तिचे अनेक फोटो सोशलवर शेअर करत असते. तिला आवडलेला फोटो ती बिंधास्तपणे शेअर करत असते मग तो कोणताही फोटो असो. कधी कधी हिना खान तिच्या फोटोंमुळे ट्रोल होतानाही दिसते. परंतु हिनाला मात्र या सर्वांमुळे काहीही फरक पडत नाही.

 

 

 

अशातच आता हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण काही वेगळे आहे. हिना तिच्या एकटीच्या फोटोमुळे नाही तर, तिने शेअर केलेल्या तिच्या प्रियकरासोबत मस्ती करणाऱ्या फोटोंमुळे हिना चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या हिनाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

हिना खानच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहे की, हिना तिच्या प्रियकराला किस करत आहे. रॉकी जायसवाल असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

 

 

 

रॉकी आणि हिना खान दोघेही मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. या त्यांच्या फोटोंवरून दोघांमधील एकमेकांवरील प्रेमही दिसून येत आहे.

 

हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत सध्या ती कोमोलिकाची भूमिका साकारत आहे.

 

सोशल मीडियात चर्चेत येणं हे हिना खानसाठी नवीन नाही. ती याआधीही अनेकदा चर्चेत राहिली आहे.

अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळेही हिना खान सोशलवर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा बोल्ड अवतार अनेकदा व्हायरल होताना दिसला आहे.