Video : ‘ही’ अभिनेत्री शिकवतेय मास्क परिधान करण्याची योग्य पद्धत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) नेहमीच चर्चेत येत असते. हिना खान सोशलवर कायमच ॲक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत आली होती. हिनाचे हॉट लुकवाले फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिनं सर्वांना मास्क परिधान करण्याची योग्य पद्धत शिकवत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यातून ती मास्क विषयी जागृती करताना दिसत आहे.

 

 

हिनानं तिच्या इंस्टावरून काही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात हिना काही लोक कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं मास्क परिधान करत आहेत हे दाखवत आहे. तिनं फक्त लोकांची चुकच नाही दाखवली तर योग्य पद्धतही सांगितली आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, ती कशा प्रकारे मास्क घालण्याची चुकीची पद्धत आणि बरोबर पद्धत सांगत आहे. बॅकग्राऊंडला एक आवाजही येत आहे. हिनाचा हा चांगला मेसेज देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. काहींना हा व्हिडीओ इतरांना शेअरही केला आहे. अनेकांनी हिनाचं या व्हिडीओसाठी कौतुक केलं आहे.

आज राज्यात 2840 नव्या कोरोना रग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासात 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 5123 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरीजमध्ये काम केलं आहे. हिनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती. हिना बिग बॉस 14 मध्येही सीनियर कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.