Hindi Compulsory In Maharashtra | महाराष्ट्रातील शाळेत पहिलीपासूनच हिंदी सक्तीची; नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

Hindi Compulsory In Maharashtra | Hindi Compulsory in Maharashtra Schools from Class 1; Possibility of New Controversy

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Hindi Compulsory In Maharashtra | मराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आता हिंदी भाषा सक्तीची केली जाणार आहे. मराठी आणि इंग्रजीसोबतच पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा देखील सक्तीची केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (National Education Policy) हिंदी भाषा सक्तीची केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार, पहिली इयत्तेपासून मराठी आणि इंग्रजीसह हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पहिली ते पाचवीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्यांनी आधीच हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला होता की आपल्यावर हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे. तामिळनाडू सरकारने सक्तीच्या हिंदी विरुद्ध आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही सक्तीच्या हिंदीवरून विविध संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. हिंदी ही तिसरी भाषा का सक्तीची असावी आणि इतर भाषा का नसावी, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

Total
0
Shares
Related Posts