Hindi Language Politics | हिंदी भाषेचे राजकारण पुन्हा पेटले, तामिळनाडूमध्ये एकाचा आत्मदहनामुळे मृत्यू

तामिळनाडू: वृत्तसंस्था- भारतातील दक्षिण राज्यांकडून हिंदी भाषेचा (Hindi Language Politics) विरोध होत आला आहे. त्यातही तामिळनाडू राज्य हिंदी भाषेच्या विरोधात सर्वात जास्त आवाज उठवताना दिसते. त्यांची द्रविड म्हणून स्वतःची ओळख, त्यांच्या तमिळ भाषेविषयी त्यांचे प्रेम आणि हिंदी राजकारणाला त्यांचा असलेला विरोध यामुळे ते हिंदी भाषेला (Hindi Language Politics) अनिवार्य करण्यास त्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा एका घटनेमुळे आली आहे. तामिळनाडूच्या एका शेतकऱ्याने हिंदी लादल्याचा विरोध करत स्वत:ला पेटवून घेतले आहे.

तामिळनाडूतील सिलेम जिल्ह्यातील ही घटना आहे. एका ८५ वर्षीय शेतकऱ्याने हिंदी लादत असल्याचा विरोध करत द्रविड़ मुनेत्र कड़गम (डिएमके) पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतले. गंभीररित्या भाजल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचे नाव थंगावेल असे सांगितले जात आहे. तो डिएमके पक्षाचा माजी कृषी संघ आयोजक होता. शनिवारी सकाळी थलाइयूर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर हिंदी भाषा लादण्याचा तो विरोध करत होता. एका खासगी वाहिनीच्या माहितीनुसार, या व्यक्तीने सकाळी ११ च्या सुमारास स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. मृत व्यक्ती डिएमके पक्षाचे सक्रिय सदस्य होते. तो केंद्र सरकारकडून हिंदी भाषेला शिक्षणाची भाषा बनवण्याच्या निर्णयामुळे व्यथित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्मदहनापूर्वी, थंगावेल यांनी एक बॅनर त्यांच्याबरोबर आणला होता. त्या बॅनर वर, ‘मोदी सरकार, आम्हाला हिंदी नकोय, आमची मातृभाषा तामिळ आहे. हिंदी जोकरांची भाषा आहे. हिंदी भाषा लादल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होईल. हिंदीपासून सुटका करा हिंदी पासून सुटका करा.’ असे लिहिले होते. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेविरोधात आंदोलन, निदर्शने सुरू आहेत. (Hindi Language Politics)

दरम्यान, तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष डीएमके युवा विंगचे सचिव आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा चिरंजीव
उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
जर आमच्या राज्यात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत येऊन
भाजपा नेतृत्वातील केंद्र सरकारचा विरोध करू. केंद्र सरकार लोकांच्या भावना पायदळी तुडवू शकत नाही,
असा इशारा त्यांनी दिला आहे. हा संपूर्ण वाद एका संसदीय समितीच्या शिफारशीवरून सुरु झाला आहे.
देशात हिंदी भाषिक राज्यात तांत्रिकी, अतांत्रिकी उच्च शिक्षण संस्था, आयआयटीमध्ये शिक्षणासाठी हिंदी वापरली पाहिजे.
तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेला कामकाजाची भाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजे,
अशी शिफारस या समितीने केली होती. त्यानंतर, केरळ आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी या शिफारशींवर
आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकार हिंदी भाषा आमच्या राज्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे,
असे त्यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Hindi Language Politics | tamil nadu news protesting hindi imposition farmer sets himself fire outside dmk office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्यासारखा श्रेष्ठ कलावंत, विचारवंत आता आपल्यात नसण्याची उणीव नेहमी जाणवत राहील

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस