हिंदी टिव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, कॉंग्रेसची तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून हिंदी टेलिव्हिजन मालिकांची मदतीने आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ‘भाभीजी घर पर हैं, आणि तुझसे है राबता’ या मालिकांमधून सरकारने आपला प्रचार केला असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

यासंदर्भात कॉंग्रेसकडून सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. असं ट्विट कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांकडे भाजपचा प्रचार करणाऱ्या टेलिव्हिजन वाहिन्यांविरोधात आणि निर्मिती संस्थांविरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये तुझसे है राबता या मालिकेतील एका प्रसंगाचा व्हिडीओदेखील दिला आहे.