हिंदू बांधव मध्यरात्री उठून तब्बल 500 मुस्लीम कैद्यांसाठी बनवतात न्याहरी

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन  –  देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाने जात-धर्म-पंत बाजूला ठेवून एकजुटीने या संकटावर मात करणं गरजेचं आहे. देशातील प्रत्येक नागरिक एकसंघ असेल तर देशावर आलेलं हे कोरोनाचा संकट पार करायला अवघड जाणार नाही. अशीच एक कौस्तुकास्पद घटना भोपाळ मध्ये घडली आहे. येथील सेंट्रल जेलमध्ये कोविड १९ च्या जीवघेण्या आजारात हिंदू-मुस्लिमांमधील बंधुप्रेम अबाधित आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असून मुस्लिमांसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो.

भोपाळ मधील सेंट्रल जेलमध्ये असलेले १५० हिंदू कैदी मुस्लिम कैद्यांसाठी मध्यरात्री उठून सहरी म्हणजेच न्याहरी तयार करतात. तसंच सायंकाळी इफ्तारीसह जेवणही हिंदू कैदीच तयार करतात. सध्या या तुरुंगामध्ये ३००० कैदी असून यापैकी ५०० कैदी मुस्लिम आहे. या सर्व मुस्लिम कैद्यांचा रोजा सुरू आहे.

या मुस्लिम कैद्यांसाठी मध्यरात्री ३ वाजता उठून १५० हिंदू कैदी सहरी तयार करतात. या मध्ये त्यांना चहा आणि रोटी दिली जाते. शिवाय सायंकाळी इफ्तारीची जबाबदारी देखील हिंदू कैद्यांवर आहे. यात त्यांना कलिंगड, फळे, खजूर आणि दूध दिलं जात. सायंकाळचे जेवणही हेच तयार करतात. जेवण बनविताना आणि नमाज अदा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. मुस्लिम कैद्यांना जेवणात वरण-भात आणि पोळी दिली जाते. त्यांचा रोजा सुरु असल्याने मुस्लिम बांधवांवर ताण येऊ नये यासाठी हिंदू बांधवांकडून या महिन्यातील संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे.