मोठा खुलासा ! पाकिस्तानी क्रिकेट संघातील हिंदू खेळाडूंना ‘नमाज’ पडण्याची होती ‘सक्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अन्याय केला जातो हे चर्चेत आले. परंतु आता पाकिस्तानी संघातील हिंदु क्रिकेटपटूंना नमाज पढण्याबाबत सक्ती केली जायची ही बाब पुढे आली आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानाच्या क्रिकेट संघाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो इंझमाम उल हक पाकिस्तान संघाचा कर्णधार असतानाचा आहे. या फोटोमध्ये संघातील मुस्लीम वगळता इतर धर्मातील खेळाडूंना नमाज पडण्यावर सक्ती केली असल्याचे दाखवण्यात आले आहे.

इंझमाम कर्णधार असताना पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. त्याच बरोबर युसूफ योहान हा इसाई होती, परंतु असे असताना या दोघांना संघाबरोबर नमाज पडण्याची सक्ती केली जायची. कारण संघाबरोबरच हे खेळाडू देखील नमाज पठन करायचे. जर त्यांच्यावर सक्ती केली गेली नसती तर त्यांना नमाज पठन केले नसते असे चाहते सोशल मीडियावर सांगत आहेत.

खासदार गौतम गंभीर म्हणाले की हिंदू मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्ये केला जातो, आम्ही तर अझरला कर्णधार बनवले होते. हिंदू-मुस्लिम भेदभाव फक्त पाकिस्तानात आहे. भारतात मुस्लिमांना समान वागणूक दिली जाते.

गंभीर म्हणाला की, सध्याच्या घडीला इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. ते स्वत: पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे कर्णधार होते, परंतु तेच सत्तेत असताना जर असं होत असेल तर निंदनीय आहे. भारतामध्ये असा भेदभाव केला जात नाही. भारतात जर असा भेदभाव झाला असता तर मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार झाला नसता.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियावर झालेल्या अन्यायाबद्दल गौप्यस्फोट केला होता की कनेरिया हिंदू असल्याने इतर खेळाडू त्याच्यासोबत गैरवर्तन करतात. त्यांच्यासोबत जेवत नाहीत. त्यानंतर कनेरियाने बोलताना सांगितले की शोएब अख्तरने सांगितलेले खरे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/