‘या’ अटीवरती ‘ती’ ‘हिंदू’ मुलगी करणार ‘मुस्लिम’ मुलाशी लग्न

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मुस्लिम तरुणासोबत लग्नाकरण्यास तयारी एका हिंदू तरुणीने दर्शवली आहे. मात्र या तरुणीने त्याच्यासमोर काही अटी घातल्या आहेत. त्या अटी जर त्या मुस्लिम तरुणाने मान्य केल्या तरच ही हिंदू तरुणी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. गुजरातमधल्या सुरतमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,  गुजरातमधल्या सूरतमध्ये एका 18 वर्षांच्या हिंदू तरुणीचे एका मुस्लिम तरुणांवर प्रेम झाले. व नंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरविले मात्र त्यांच्या प्रेमाच्यामध्ये धर्माचे बंधन आले. त्यावर त्या हिंदू तरुणीने लग्नास तयारी दर्शवली. असे असले तरी या तरुणीने काही अटी त्या तरुणापुढे ठेवल्या. या हिंदू तरुणीने कतारगाम पोलीस स्टेशनमध्ये तसे प्रतिज्ञापत्र दिले आणि त्यात लिहिले कि, मी लग्नाला होकार जरी दिली, तरी मी काही अटी तुझा जवळ मांडणार आहेत त्या म्हणजे त्याला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल, मला मांसाहार करण्यास प्रवृत्त करू नये, व तसेच त्यालाही मांसाहार सोडाव लागेल, अशा काही अटी तिने त्या प्रतिज्ञापत्रात लिहिल्या आहेत.

याबाबत तिने २४ एप्रिलला पोलीस ठाण्यात पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले कि, तो मुलगा जेंव्हा हिंदू धर्म स्वीकारेल तेंव्हाच मी त्याचसोबत लग्न करण्यास मान्यता देईल, तसेच त्याने कधीच मुस्लिम धर्म स्वीकारू नये आणि आपल्या परिवाराचा मदतीने धर्म परिवर्तन करावं. त्या हिंदू तरुणीला त्या मुलावर प्रेम आहे व त्या दोघांचा एकमेकांमध्ये खूप जीव आहे.

दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतरी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली व मुलीचा शोध सुरु केला. तिचा तपास लावला. त्यावेळी हा प्रकार समोर आला. दरम्यान तिने तिच्या घरच्यांना सांगितले कि, मला त्या मुस्लिम तरुणाशी लग्न करायचे आहे, त्यावर तिचा काकाने तिला समजून सांगितले कि, तुला लग्न करायचे असेल तर तुला लग्नानंतर मांसाहार करावा लागेल, तसेच मास मच्छी आणि मटण बनवावं लागेल. म्हणून या तरूणीने तसे प्रतिज्ञापत्र पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. विशेष म्हणजे तिने ११ मार्च रोजीच लग्नासाठी नोंदणी केली आहे, परंतु त्या मुलाला तिने मांडलेल्या अटी मान्य कराव्या लागतील तरच मी लग्नासाठी तयार आहे असे तिने सांगितले.

Loading...
You might also like