मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hindu Janakrosh Morcha Mumbai | लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतर विरोधातील कायदा (Anti Conversion Law) राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा या मागणीसाठी रविवारी मुंबईत सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha Mumbai) काढण्यात आला होता. दादरच्या शिवाजी पार्कपासून (Shivaji Park) ते कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या (BJP) नेत्यांसह शिंदे गटाचे (Shinde Group) नेते सहभागी झाले होते.
लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात सकल हिंदु समाजाने आयोजित केलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचे विराट स्वरूप@BJP4Mumbai @BJP4Maharashtra#HinduJanAkroshMorcha pic.twitter.com/1MoqysA2ez
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 29, 2023
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकर प्रकरणी (Shraddha Walker Case) आरोपी आफताबला जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha Mumbai) काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व महिला करताना दिसून आल्या. मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा देण्यात आल्या.
या मोर्चात भाजपच नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar), खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak), किरीट सोमय्या (Kirit Somaiya), चित्रा वाघ (Chitra Wagh), आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane), आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar), आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad), विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), केशव उपाध्ये (Keshav Upadhyay), खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty), वकील गुणरत्न सदावर्ते (lawyer Gunaratna Sadavarte) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हा मोर्चा म्हणजे संतप्त भावनेचे स्वाभाविक प्रतिक्रिया- शेलार
मोर्चात सहभागी झालेले आशिष शेलार म्हणाले, सकल हिंदू समाजाने काढलेला हा मोर्चा आहे.
त्यामुळे पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत.
लव्ह जिहाद आणि मुंबईतील लँड जिहादविरोधात हिंदू समाजात संतप्त भावना आहे.
हा मोर्चा म्हणजे संतप्त भावनेची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आम्ही कट्टर हिंदू म्हणूनच या मोर्चात सहभागी झालो आहोत.
मुंबई और उसके आसपास के इलाकों में लव जिहाद जैसे मामलों में भारी वृद्धि हुई है। इस विरोध की स्वाभाविक प्रतिक्रिया के रूप में संपूर्ण हिंदू समुदाय द्वारा आयोजित किया गया यह एक गैर-राजनीतिक मोर्चा है। हम एक कट्टर हिंदू होने के नाते इस मोर्चा में शामिल हुए हैं।#HinduJanAkroshMorcha pic.twitter.com/Q4r3jfA2XS
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 29, 2023
दरम्यान, मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत.
या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा (Mumbai Police) मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
मोर्च्याच्या प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
अशा मोर्चात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
Web Title :- Hindu Janakrosh Morcha Mumbai | Hindu jan aakrosh morcha in mumbai against lover jihad mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…