पुण्यातील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला हिंदु जनजागृतीचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सनबर्न फेस्टिव्हल पुण्यात मागील दोन वर्षांपासून होत असून प्रत्येकवेळी हिंदु जनजागृती समिती विरोध करत असते. यावेळीही समितीने विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील २ वर्षापासून गोव्यातून हद्दपार केलेल्या आणि पुण्यात चालू झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदु जनजागृती समितीचा विरोध आहे.

यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणारे हे फेस्टिवल गेल्या काही वर्षांमध्ये वादग्रस्त ठरले आहे. यावर्षी पुन्हा एकदा या कार्यक्रमावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे.

त्याप्रमाणेच हिंदु जनजागृती समितीनेही या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आश्चर्यची बाब म्हणजे मागच्यावेळी पुण्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच सनबर्नला अभय दिले होते. त्यानंतर आयोजकांनी सनबर्न फेस्टिव्हलचे बिनधासपणे आयोजन केले होते.