ब्रेकिंग : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

लखनौ : वृत्तसंस्था – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून आणि गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. पैगंबरांवरील विधानामुळे तिवारी चर्चेत होते. या घटनेमुळे संपूर्ण उत्तरप्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 हल्लेखोरांनी खुर्शीद बाग येथील हिंदू महासभा पार्टीच्या कार्यालयात आल्यावर त्यांची हत्या केली. चहा पिण्यासाठी आल्याचा बहाणा करून तिवारींची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी मिठाईच्या डब्यात चाकू आणि पिस्तूल आणले होते. तिवारी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी तिवारींना मयत घोषित केले आहे.


तिवारी यांच्या नोकराच्या समोरच हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हल्लेखोर आणि तिवारी यांच्यामध्ये एका लग्नाच्या सोहळ्यावरून बातचीत चालु असतानाच तिवारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हिंदू समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कार्यकर्ते चालू असलेले दुकाने बंद देखील करीत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह हिंदू महासभेचे नेते देखील घटनास्थळी पोहचले आहेत.

दरम्यान, डिसेंबर 2015 मध्ये तिवारींनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी तिवारींना अटक देखील झाली होती. त्याप्रकरणी ते जामीनावर बाहेर होते. तिवारींची गोळ्या झाडून आणि गळा दाबून हत्या केल्याचे वृत्त जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्यानं लखनौ शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या