हिंदू महासभेने सुरू केलं ‘गोडसे स्टडी सर्कल’, वाद निर्माण होण्याची शक्यता (व्हिडीओ)

भोपाळ: पोलिसनामा ऑनलाईन – महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे (nathuram godse) देशात अनेक समर्थक आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने ग्वालियरच्या दौलतगंज येथील कार्यालयात गोडसे स्टडी सेंटर सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून हिंदू महासभा नथुराम गोडसेच्या (nathuram godse) देशभक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. तसेच गोडसेच्या कार्याची ओळख करुन देणार आहे, तसेच त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना संकल्प देणार असल्याचे समजते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, सभेने गोडसे स्टडी सर्कल सुरु केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

हिंदू महासभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गोडसेसह वीर सावरकर, रानी लक्ष्मीबाई आणि संघाशी संबंधी पदाधिकाऱ्यांच्या फोटोंचे पूजन केले आणि त्यांना श्रद्धासुमन अर्पित केले. भूतकाळातील महापुरुषांबाबत नव्या पिढीला माहिती करुन देता यावी, यासाठी कार्यशाळा सुरु करण्यात आल्याचं हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराना प्रताप यांचा इतिहासही तरुणांना शिकवला जाणार आहे.

काहींच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधी यांच्या हत्त्येची तयारी ग्वालियरमध्ये करण्यात आली होती आणि हत्त्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल तत्कालीन सिंधिया राज्याच्या चिन्हाचे होते. दरम्यान, हिंदू महासभा दरवर्षी नथुराम गोडसेचा बलिदान दिवस आणि जन्मदिवस साजरा करते. काही वर्षापूर्वी हिंदू महासभेने आपल्या कार्यालयात गोडसेची प्रतिमा स्थापित केली होती. पण वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रतिमा जप्त केली.