आम्ही तर मोहम्मद अझरूद्दीनला कॅप्टन बनवलं ! ‘हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदू-मुस्लिम भेदभावाला घेऊन भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदू-मुस्लिम भेदभाव फक्त पाकिस्तानातच केला जातो असं गंभीर म्हणाला आहे.
गंभीर म्हणाला, “सध्याच्या घडीला इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. ते स्वत: पाकिस्तानचे कॅप्टन होते. परंतु त्यांच्या राज्यातच असे होत असेल तर हे निंदनीय आहे. भारतात असा भेदभाव केला जात नाही. भारतात असा भेदभाव केला जात असता तर मेहम्मद अझरूद्दीन कधी कॅप्टन झाला नसता.”
Gautam Gambhir, BJP: Despite having Imran Khan as the Prime Minister, a sportsman who represents his country has to go through all this. It is shameful. https://t.co/SwXC7hAWK7
— ANI (@ANI) December 27, 2019
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानी क्रिकेट संघात हिंदू खेळाडूंवर अन्याय केल्याच गौप्यस्फोट केला होता. माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाचं उदाहण त्यानं दिलं होतं. शोएब अख्तर म्हणाला होता की, “पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडूही होता. हिंदू असल्यानं कायमच त्याच्यावर अन्याय करण्यात आला. त्यानं संघाला अनेक विकेट्स मिळवून दिल्या. सामने आणि मालिकाही जिंकून दिल्या. असं असलं तरीही त्याला सोबत जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंच्या तळपायाची आग मस्तकात जायची. त्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूची कारकीर्द अल्पावधीत आटोपली. नाहीतर त्यानं जास्त काळ संघाची सेवा केली असती. हा हिंदू खेळाडू होता दानिश कनेरिया.”
दानिश कनेरिया एएनआयल्या दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता की, “शोएब अख्तरनं जे काही सांगितलं ते खरं आहे. मी हिंदू असल्यानं जे खेळाडू माझ्यासोबत काही खात पित नस अशा खेळाडूंची नावं मी जाहीर करणार आहे. हे वास्तव सर्वांसमोर आणण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मात्र आता मी गप्प बसणार नाही.”
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- आरोग्यासाठी लाभदायक आक्रोड, खरेदी करताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा
- ‘ही’ आहेत मासिक पाळीच्या अनियमिततेची ५ कारणे !
- त्वचेचे सौंदर्य राखतील ‘ही’ ४ व्हिटॅमिन्स, जाणून घ्या फायदे
- PCOS वर नियंत्रण असे मिळवा, ‘ही’ आहेत १२ लक्षणे
- चमकदार त्वचेसाठी बेसन वापरून बनवा ‘हे’ ५ फेसपॅक !