कौतुकास्पद ! मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील विविध भागांमध्ये हिंदू-मुस्लिमांनी परस्परांना मदत केल्याच्या अनेक घटना आहेत. अशातच आता एका मुस्लिम मामाने दोन हिंदू मुलीचे कन्यादान केल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. माणुसकीचा धर्म, लॉकडाउनमध्ये बंधुभावाचे दर्शन यासारख्या कमेंट करत नेटकर्‍यांनी फोटो पोस्ट केला आहे. तर काहीही व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सलाही ऐक्याचे दर्शन करणारा हा फोटो ठेवला आहे.

लग्नानंतर सासरी जाताना त्या मुली मुस्लीम मामाच्या गळ्यात पडून रडत आहेत. हे पाहून आनेकजन भावनावश झाले आहेत. प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांनी या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भारताचे हे खरे चित्र असल्याचे म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील हा प्रसंग असून सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गावखेड्यात काबाड कष्ट करत सविता भुसारी यांनी दोन्ही मुलींना मोठे केले. सविता यांना भाऊ नसल्यामुळे घरासमोर राहणार्‍या बाबा पठाण यांना त्यांनी गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली. भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. नवर्‍या मुलींची आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली आहे.