धर्माच्या भिंतीपेक्षाही माणुसकी मोठी ; आजारी मुस्लिम चालकासाठी हिंदू अधिकाऱ्याचा रोजा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात सामाजिक सलोख्याची उदाहरणे समोर येत आहे. एका मुस्लीम युवकाने रोजा तोडून हिंदू गर्भवती महिलेचा जीव वाचावा यासाठी रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवले. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात सामाजिक सलोख्याची उदाहरणे समोर येत आहे. एका मुस्लीम युवकाने रोजा तोडून हिंदू गर्भवती महिलेचा जीव वाचावा यासाठी रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवले. तर आजारी असणाऱ्या आपल्या मुस्लिम चालकासाठी हिंदू अधिकाऱ्याने चक्क रोजा पाळला आहे.

बुलढाण्यात विभागीय वन अधिकारी म्हणून काम करत असणाऱ्या संजय माळी यांनी आपल्या जफर या आजारी चालकासाठी रोजा पळाला आहे. ६ मे पासून रोज पहाटे ४ वाजता उठतात आणि जेवण करतात. नंतर संध्याकाळी सात वाजता रोजा सोडतात.

संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वाथ्यामुळे जफरला रोज पाळणे शक्य नव्हते. म्हणून त्याच्याऐवजी मी रोजा पाळण्याचं ठरवलं. आपण सर्वांनीच सांप्रदायिक सलोख्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रथम माणुसकी पाहिली पाहिजे, धर्म द्वितीय आहे. रोजा ठेवल्यापासून मला खूप फ्रेश वाटत आहे’.