हिंदूराष्ट्र संकल्पना ही सर्वधर्म समावेशक : डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान हे प्रत्येकाला सोबत घेऊन जाते. हिंदूराष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना स्थानच नाही असे नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल त्या दिवशी हिंदुत्व संपेल. हिंदुत्व हे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेबद्दल बोलते. हिंदूराष्ट्र ही सर्वधर्म समावेशक संकल्पना आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भविष्यातील भारत या विषयावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानात ते दिल्लीत बोलत होते.

[amazon_link asins=’8193305205,B00FT694AC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f31a44ce-bbc0-11e8-9c61-bfdb33b9cd4f’]

भागवत म्हणाले, संघ जागतिक बंधुभावाच्या संकल्पनेसाठी कार्यरत आहे आणि या बंधुभावाच्या संकल्पनेत विविधतेतून एकता अभिप्रेत आहे. हिंदुत्व हे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे सार आहे आणि विविध धर्म, विचारांच्या लोकांमध्ये बंधुभाव रुजवणे त्याचे उद्दिष्ट आहे. हिंदुत्व ही संकल्पना भारतीयत्वच्या संकल्पनेशी समानता साधणारी आहे. ज्या सर्व भारतीय अभिप्रेत आहेत. ती विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. संघदेखील याच भारतीयत्वाच्या संकल्पनेत विश्वास ठेवतो. त्यामुळे इथला मुस्लीम हिंदुत्वाला वर्ज्य नाही. हिंदुत्व असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, भारतीय म्हणा. पण या शब्दाला संघाचा विरोध नाही. आधुनिक भारत हा राज्यघटनेवर आधारलेला असून देशातील प्रत्येक नागरिक घटनेला बांधला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राज्यघटनेला श्रेष्ठ मानतो आणि त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशी विचारांचा आधार घेऊन राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा समावेश केलेला नाही. हा विचार त्यांना भारताच्याच भूमीतून, बुद्धाच्या विचारातून मिळालेला आहे. कोणीही शत्रू नसून प्रत्येकाला बरोबर घेऊन मानवविकासाचा हा विचार आहे आणि याच मूल्यांचा संग्रह म्हणजे हिंदुत्व, असे मत डॉ. भागवत यांनी मांडले.

भारतामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक

भारतीय परंपरेत धर्म हा शब्द धर्मशास्त्रापुरता मर्यादित नाही, तो मानवधर्म या अर्थाने वापरला जातो. इंग्रजीत भाषांतर करताना त्याला रिलिजनचे मर्यादित स्वरूप येते. म्हणजे पूजापाठ, कर्मकांड, मसीहा वगैरे अर्थाने रिलिजन हा शब्द वापरला जातो. पण हिंदुत्वाचा धर्म म्हणजे विश्व हे कुटुंब. या संकल्पनेमुळेच प्रत्येक आक्रमणातून आलेली संस्कृती भारताने स्वीकारली. प्रत्येकाला सामावून घेण्याच्या मूल्यामुळे विदेशात हिंदुत्वाचा अर्थ समजावून सांगताना धर्मपरिवर्तनाचा अट्टहास धरला नाही, अशी मांडणी भागवत यांनी केली.

आरएसएसवर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देताना भागवत म्हणाले, देशाचे सत्ताकेंद्र दिल्लीतच असून ते नागपूरवरून चालवले जात नाही. पंतप्रधानांना वा केंद्र सरकारमधील मंत्र्यांवर नागपूरवरून फोन करून राजकीय अंकुश ठेवला जात नाही.

शिक्षणमंत्री विनादे तावडे यांना न्यायालयाची अवमान नोटीस