पुणे : हिंदूराष्ट्र सेनेच्या 37 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड परिसरातील गांधी भवन परिसरात सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात निदर्शने करणार्‍यांविरोधात एकत्रित जमून त्यांना विरोध करणार्‍या हिंदू राष्ट्र सेनेच्या 37 कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. मोर्चाची परवानगी नाकरल्यानंतरही त्यांनी एकत्रित जमून विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला.

संतोष ऊर्फ अण्णासाहेब किसन देवकर (वय 30, रा.फुरसूंगी), सुरज सुरेश महतो (वय 22, रा.मु.पो.शिरवळ, ता.खंडाळा), मयुर शांताराम गाडे (वय 29, रा.मु.पो. कापुरहोळ, ता.भोर), सागर पांडूरंग गाडे (वय 28, रा. मुपो कापुरहोळ), संकेत सतीश ढमाळ (वय 23, रा.मु.पो. असरोली, ता.खंडाळा), प्रशांत सुरेश रेवडीकर (वय 32, रा.मु.पो. शिरवळ, ता. खंडाळा), सुनिल विजय खळदकर (वय 30, रा.मुपो नेरे, ता.भोर), सचिन बाळासाहेब विर (वय 31, रा.मुपो.उतरवली, ता.भोर), प्रकाश शंकर शेटे (वय 21, रा.मु.पो. उतरवली, ता.भोर), रोहित महेश पवार (वय 22, रा. पोस्ट भादवडे ता.खंडाळा), वैजनाथ अरुण भगत (वय 36. रा.मांजरी फार्म मोरेवस्ती, ता.हवेली) संतोष नामदेव कामठे (वय 32. रा. फुरसूंगी गांव), नाना सुदाम जवळकर (वय 31, रा.आळंदी म्हातोबाचीवाडी), वृध्देश्वर विश्वास गर्जे (वय 32, रा.भेकराईनगर त्रिवेणी विहार, ता.हवेली), अप्पा बापूसाहेब गोरे (वय 30, रा. सरतापवाडी ता.हवेली), अरुण उर्फ पप्पू बाळासाहेब कडू (वय 32, रा.वारजे माळवाडी), प्रशांत दिलीप मेमाने (वय 22, रा.नायगाव, ता.हवेली) प्रविण अशोक गायकवाड (वय 22,रा.सरतापवाडी,ता.हवेली) अक्षय तुकाराम पांचाळ (वय 25, रा. भेकराईनगर) विजय मनीराम पांचाळ (वय 27 रा.फुरसूंगी), अक्षय विठठल कामठे (वय 25 रा. फुरसूंगी), रोहीत भुजंग सुर्यवंशी (वय 28 रा.ससाणेनगर), उमेश चंद्रशेखर वाडकर (वय 25 रा.सातववाडी), उल्हास दत्तात्रय तुपे (वय 45 रा. माळवाडी) आकाश सुभाष जाधव (वय 23 रा.हडपसर), नागेश आत्माराम भुरे (वय 25 रा. हडपसर) नागेश किसनराव रेड्डी (वय 29 रा.फुरसूंगी), लोकेश चंद्रशेखर कोंढरे (वय 29, भवानी पेठ), अमर सुनिल येडके (वय 22,रा.फुरसूंगी), अक्षय शिवाजी पवार (वय 26 वर्षे,रा.माळवाडी), मयूर दत्तात्रय मोरे (वय 32. रा.स. नं. 13 सातववाडी), संचीत सुरेश काळे (वय 24,रा. हडपसर), गणेश रमेश काळे (वय 24) अक्षय विठ्ठल पवार (वय 23, मुपो.उतरवली,ता.भोर), अक्षय दिलीप काळभोर (वय 23. रा.रायवाडी, लोणी काळभोर), मयुरेश प्रकाश पवार (वय 21. रा. चिखली, ता-हवेली) अक्षय राजू खंदारे (वय 24, कासारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यावर भा.दं.वि. 143, सह महा.पो.अधि. कलम 37(1)(3)सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात मोर्चे तसेच आंदोलन करून विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यासोबतच या कायद्याच्या बाजूनेही काही संघटना व नागरिक उभे आहेत. त्यांच्याकडून कायद्याचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, गुरूवारी दुपारी कोथरूड परिसरात असणार्‍या गांधी भवनजवळ नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्त काही संघटना व नागरिकांकडून सीएए व एनआरसीविरोधात आंदोलन व मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार होती. त्याला विरोध करत हिंदूराष्ट्र संघटनेकडून या आंदोलनाला विरोध दर्शविला होता. तसेच, त्याठिकाणी विरोध दर्शविण्यासोबतच तसेच कायद्याच्या बाजूने निदर्शने करण्यासाठी पोलीसांची परवानगी घेऊन निदर्शने दुपारी साडे सहाच्या सुमास करण्यात येत होती. मात्र त्यावेळी अचानक हिंदूराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ येथील वातावरण तणावपुर्ण झाले होते. परंतु, पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करून या आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाईकरून त्यांना अटक केली. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.