ऐतिहासिक ! पाकिस्तानमध्ये प्रथमच हिंदू महिला ‘पुष्पा कोहली’ बनली पोलिस अधिकारी

इस्‍लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये प्रथमच हिंदू मुलगी पोलिस अधिकारी बनली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी असलेल्या पुष्पा कोहलीला सहाय्यक उपनिरीक्षकपदी नेमण्यात आले आहे. सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. ही माहिती सर्वप्रथम मानवधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी ट्विटद्वारे शेअर केली होती.

ट्विटमध्ये कपिल देव यांनी म्हंटले होते की, ‘उत्कृष्ट बातमीः पुष्पा कोल्ही हिंदू समाजातील पहिली महिला ठरली आहे. जी सिंध प्रांतातील नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन, सिंध पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक झाली आहे. त्यांना आणखी बळ मिळो.’

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पोलिसांनी पहिल्यांदाच आपल्या पथकात एखाद्या हिंदू महिलेचा समावेश करून घेतला आहे. बुधवारी माध्यमांकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. पाकिस्तानात हिंदू हे अल्पसंख्याक आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात ७५ लाख हिंदू आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू समाजाचे लोक राहतात.

यावर्षी जानेवारीत हिंदु समुदायाच्या सुमन पवन बोदानी पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. त्याही सिंध प्रांताच्या रहिवासीही आहेत. दिवाणी न्यायाधीश / न्यायदंडाधिकारी यांच्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी 54 वा क्रमांक मिळविला होता. मार्च 2018 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) नेते कृष्णा कुमारी यांनी खासदारकीच्या निवडणुकीत विजय मिळविला. हिंदू समुदायाची खासदार होणारी ती पहिली पाकिस्तानी महिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like