पाकिस्तानात हिंदूंवर धर्मांतराची बळजबरी, छळवणुकीविरोधात महिला उतरल्या रस्त्यावर

इस्लामाबाद :  वृत्तसंस्था –   पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदूंचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या भागात हिंदू महिलांचा छळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल छाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक हिंदू महिला ओरडून सांगत आहे की, आम्ही मरणं पसंत करू पण कधीही इस्लाम धर्म स्वीकारणार नाही. सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदू असल्याची माहिती उघड झाली आहे.

पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंचा तबलिगी जमातच्या लोकांकडून छळ केला जाता असल्याचा आरोप होत आहे. सिंध प्रांतातील तबलिगी जमातच्या लोकांनी हिंदूंवर अत्याचार केला जाता असल्याचा आरोप तेथील लोकांनी केला आहे. भिल्ल समुदायाच्या या हिंदू लोकांवर जबरदस्तीनं इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणच्या महिला आता रस्त्यावर उतल्या आहेत.
महिलांसोबत लहान मुलंही पोस्टर झळकावून धर्मांतराला विरोध करत असल्याचे चित्र सध्या तिकडे पहायला मिळत आहे. इस्लामिक कट्टरपंथीयांकडून तिथल्या हिंदूंवर अत्याचार केला जात असल्याची प्रकरणे देखील समोर आली आहेत. विशेष म्हणजे तबलिगी जमातचे लोक त्यांना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करत असल्याचाही तिथल्या हिंदूंचा आरोप आहे.

https://twitter.com/johnaustin47/status/1261596359934619650

या ठिकाणच्या एका महिलेने व्हिडिओत सांगितले की, पाकिस्तान सरकारच्या अल्पसंख्याक परिषदेने या घटनेची तातडीने चौकशी करण्याच आदेश दिले पाहिजेत. कारण हिंदू समाज सिंधमध्ये सक्तीने धर्मांतर करण्याविरोधात दीर्घ काळापासून निषेध नोंदवत आहे. सिंध प्रांतातील हिंदूंचा असा आरोप आहे की, तबलिगी जमात गटाच्या लोकांनी धर्म परिवर्तना नकार दिल्यामुळे सिंध प्रांताच्या मटियार परिसरातील नसूरपूर गावातील घरांचे नुकसान केले आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.

छळ होत असलेल्या महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत मूळचे पाकिस्तानी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी निषेध नोंदवला आहे. जिहादच्या नावाखाली अनेकांना दहशतवादाकडे वळवले जात आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचे धर्मांतर करणे हे त्यांचे लक्ष आहे, यासाठी ते प्रत्येक वाईट गोष्टी करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.