योगी सरकारच्या मंत्र्यानं दिली ‘हम पांच’ची घोषणा, हिंदूनीं 3 मुलांना जन्म द्यावा

लखनऊ : पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान मोदींनी लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे संगितले असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्याने केलेल्या बेताल विधानामुळे भाजपच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. उत्तर प्रदेशातील मंत्री सुनील भराला यांनी हिंदू कुटुंबाने तीन मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.

‘आजकाल समाजात फक्त दोन मुलांना जन्म द्या, अशी मागणी केली जाते. मात्र त्यासंबंधीचा कोणताही कायदा नाही, बहुतांश हिंदू कुटुंब एकाच मुलाला जन्म देतात. परंतु, मला वैयक्तिक असं वाटतं की, हिंदू कुटुंबीयांनी हम पॉंच याचा विचार करायला हवा. प्रत्येक कुटुंबात तीन मुले आणि त्यात एक मुलगी असायला हवी, असं विधान सुनील भराला यांनी केलं आहे. इदरीशपूर गावातील एका समारंभात बोलताना त्यांनी हे निराधार वक्तव्य केलं आहे.

तसेच भराला पुढे म्हणाले कि, ‘हैदराबाद येथे जे घडले ते दुर्दैवी आहे. पोलिसांनी चांगले काम केले, उन्नाव घटनेबाबतही उत्तर प्रदेश सरकार गंभीर असून गुन्हेगारांना सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेकदा भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्ष अडचणीत येत असतो. हे लक्षात घेता त्या नेत्यांना केंद्रातून तंबी दिली जाते, मात्र त्यानंतरही भाजपा नेत्यांची बेताल विधानं सुरुच असल्याचं दिसून येतं आहे.

Visit : Policenama.com